योजना
ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना
वैयक्तिक लाभाच्या योजना
प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)
ही घरकुलाची केंद्र पुरस्कृत योजना असून इंदिरा आवास योजनेचे
रूपांतर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मध्ये करण्यात आले आहे.
सन 2016-17 पासून योजनेची अंमलबजावणी सुरू आहे.
केंद्र व राज्य हिस्सा 60:40 आहे.
कागदपत्रे:
- आधार कार्ड
- बँक पासबुक झेरॉक्स
- जागेची कागदपत्रे
- जॉबकार्ड
लाभाचे स्वरूप:
2 लक्ष रुपये पर्यंत
निवड प्रक्रिया:
SECC-2011 माहितीच्या आधारे
रमाई आवास योजना
महाराष्ट्र शासनाची योजना असून अनुसूचित जाती (SC) व
नवबौद्ध घटकांतील कुटुंबांना पक्के घर उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे.
पात्रता:
- अनुसूचित जाती / नवबौद्ध प्रवर्ग
- वार्षिक उत्पन्न ₹1,20,000 पर्यंत
- पक्के घर नसावे
- पूर्वी घरकुल लाभ घेतलेला नसावा
कागदपत्रे:
- रहिवासी प्रमाणपत्र
- जातीचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला
- बँक पासबुक, जॉबकार्ड, जागेची कागदपत्रे
लाभ:
₹1,20,000 + मनरेगा मजुरी + शौचालय अनुदान
निवड:
ग्रामसभा → जिल्हा समिती
पं. दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजना
घरकुलासाठी पात्र परंतु जागा नसलेल्या कुटुंबांसाठी
जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्याची योजना.
कागदपत्रे:
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- जागा खरेदी कागदपत्रे
लाभ:
₹1,00,000 पर्यंत
निवड:
गट विकास अधिकारी समिती
सार्वजनिक विकासाच्या योजना
यात्रास्थळ विकास कार्यक्रम
क वर्ग दर्जा असलेल्या तीर्थक्षेत्रांमध्ये भाविकांसाठी
सुविधा निर्माण करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
- भक्त निवास
- वाहनतळ
- स्त्री / पुरुष शौचालय
- पाणीपुरवठा व दिवाबत्ती
- संरक्षक भिंत
अटी:
प्रशासकीय व तांत्रिक मान्यता आवश्यक
जल जीवन मिशन
हर घर नल से जल संकल्पनेनुसार प्रत्येक घरात
दरडोई किमान 55 लिटर प्रती दिन पाणीपुरवठा.
- राष्ट्रीय जल जीवन मिशन
- राज्य पाणी व स्वच्छता मिशन
- जिल्हा व ग्रामस्तरीय समित्या
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
ग्रामीण कुटुंबांना अकुशल रोजगाराची हमी देणारी केंद्र पुरस्कृत योजना.
- 100 दिवस रोजगाराची हमी
- 15 दिवसात मजुरी वाटप
- बँक / पोस्ट खात्यात मजुरी
अंमलबजावणी:
ग्रामसभा मार्फत